धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.24 जुलै रोजी मोटार वाहन कायदा-नियम भंग प्रकरणी एकुण 397 कारवाया करुन 3,02,800 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
ढोकी पोलीस ठाणे: आरोपी नामे-नानी अनिल शिंदे, वय 35 वर्षे, रा. वाखरवाडी ता. जि. धाराशिव या दि.24.07.2025 रोजी 19.35 वा. सु वाखरवाडी येथे अंदाजे 5,800 ₹ किंमतीची 58 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये ढोकी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“ जुगार विरोधी कारवाई.”
लोहारा पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान लोहारा पोलीसांनी दि.24.07.2025 रोजी 18.35 वा. सु. लोहारा पो ठाणे हद्दीत दयानंद चौले रा. जेवळी शिवार यांचे शेतातील पत्राचे शेडसमोर मोकळ्या जागेत छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-गुंडेशा सिद्राम होनाजे, वय 43 वर्षे, बाबासाहेब मुकींद सोनकांबळे, वय 39, दयानंद काशिनाथ जाधव, वय 48 वर्षे, मंगेश प्रकाश साकलगावकर, वय 35 वर्षे, प्रदिप काशिनाथ होनाजे, वय 50 वर्षे, सर्व रा. जेवळी दक्षिण ता. लोहारा जि. धाराशिव हे 18.35 वा. सु. दयानंद चौले रा. जेवळी शिवार यांचे शेतातील पत्राचे शेडसमोर मोकळ्या जागेत तिरट मटका जुगाराचे साहित्य एकुण 4,200 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले लोहारा पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये लोहारा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
शिराढोण पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान शिराढोण पोलीसांनी दि.24.07.2025 रोजी 19.00 वा. सु. शिराढोण पो ठाणे हद्दीत शिराढोण गावाजवळ कळंब ते लातुर जाणारे रोडवरील हॉटेल तिरंगाच्या पाठीमागील बाजूस मोकळ्या जागेत छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-रामा नगुराव कोळी, वय 66 वर्षे,नितीन लक्ष्मण पाटील दोन्ही रा. शिराढोण ता. कळंब जि. धाराशिव हे 19.00 वा. सु. शिराढोण गावाजवळ कळंब ते लातुर जाणारे रोडवरील हॉटेल तिरंगाच्या पाठीमागील बाजूस मोकळ्या जागेत कल्याण मटका जुगाराचे साहित्य एकुण 2,110 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले शिराढोण पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये शिराढोण पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.